सातारा – लोकसभा निवडणूक जाहीर होताच देशासह राज्यातील राजकारणात रोज नव्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. त्यातच आता सातारा लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे. याठिकाणचे विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारी नाकारल्याचे सांगण्यात येत आहे. सातारा लोकसभेच्या रिंगणातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली आहे. तब्येत ठीक नसल्याने मी निवडणूक लढवू इच्छित नाही, असे पाटील यांनी शरद पवारांना कळवले आहे. पवार आज सातारा दौ-यावर आहेत. उमेदवार कोण असावा? याबाबत ते विधानसभा मतदारसंघनिहाय बैठकीत निर्णय घेणार आहेत.