मणिपूरमध्ये लवकरच परिस्थिती ठीक होईल – अमित शाह

0

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये लवकरच परिस्थिती ठीक होईल असे वक्तव्य देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी एका मुलाखतीमध्ये केले आहे. मणिपूर दीड वर्षांहून अधिक काळ धुमसत आहे. मे २०२३ मध्ये सुरू झालेल्या या संघर्षात ३०० हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि हजारो लोक विस्थापित झाले आहेत. इम्फाळ खोऱ्यात राहणारा मेईतेई समाज आणि आजूबाजूच्या डोंगराळ भागात राहणारा कुकी समाज यांच्यात हा तणाव आहे. बहुसंख्य मेईतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मागणीच्या विरोधात गेल्या वर्षी एकता मोर्चा काढल्यानंतर उसळलेला जातीय हिंसाचार आजही कायम आहे. मी हे निमित्त म्हणून सांगत नाही, तर पार्श्वभूमीबद्दल बोलत आहे. मणिपूरमध्ये जेव्हा-जेव्हा वांशिक हिंसाचार झाला, तेव्हा तो दीड वर्ष चालू राहिला. अनेक वेळा हिंसाचार तीन वर्षांपर्यंत चालला असून त्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.

जातीय हिंसाचारामुळे हे घडले. मात्र, आता हिंसाचार बऱ्यापैकी कमी झाला आहे, त्यामुळे या लोकांनाही संसदेत गदारोळ करून विषय भडकावायचा आहे. पण आता परिस्थिती ठीक होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. एका मुलाखतीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. विरोधकांकडून याच मुद्द्यावरुन केंद्र सरकारला घेरण्याचा वारंवार प्रयत्न देखील केला जात आहे. अशातच शनिवारी ककचिंग जिल्ह्यात दोन मजुरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर येथील परिस्थिती पुन्हा एकदा तणावपूर्ण बनली आहे. मणिपूरमधल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech