हिंगोली – कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. अशातच सध्या संतोष बांगर यांच्या घराबाहेर गोळीबार झाल्याचा दावा ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयकाने केला आहे.
संतोष बांगर यांच्या हिंगोली शहरातील घरासमोर फायरिंग झाल्याच्या चर्चा आहेत. २७ मे रोजी बांगर यांच्या घराबाहेर फायरिंग झाल्याचे ट्वीट ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांनी केले आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. दरम्यान, असे काहीही झालेले नाही, काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया संतोष बांगर यांनी प्रसार माध्यमांना बोलताना दिली आहे.
कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या हिंगोली शहरातील घरासमोर २७ मे रोजी गोळीबार झाला असल्याचे ट्वीट ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांनी केला आहे. कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहतात. अशातच आता त्यांच्या घरासमोरच एका व्यक्तीने शिवीगाळ करत गोळीबार केला असल्याचा दावाही अयोध्या पौळ यांनी केला आहे. तसेच, सत्ताधारी आमदार महाराष्ट्राच्या जनतेला काय खरं, काय खोटं, हे सांगतील का? असा सुद्धा सवाल अयोध्या पौळ यांनी आमदार बांगर यांना विचारला आहे. यामध्ये आमदार संतोष बांगर यांना विचारणा केली असता, काहीही झालेलं नाही, काहीही संबंध नाही, असे त्यांनी सांगितले आहे. थोडक्यात अशी कोणतीही घटना झाली नसल्याचे आमदार संतोष बांगर यांनी सांगितले आहे.