शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांचा कुडाळात सत्कार

0

सिंधुदुर्ग : शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांचा कुडाळ तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने आज सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे नवनियुक्त उपनेते संजय आंग्रे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीम.वर्षाताई कुडाळ,शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना भजन संघटना जिल्हाप्रमुख रामचंद्र परब उपस्थित होते. दत्ता सामंत यांनी कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेचा भगवा हाती घेतला होता. आज ते कुडाळमध्ये दाखल होताच त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेनेचे कुडाळ तालुकाप्रमुख.योगेश उर्फ बंटी तुळसकर,अरविंद करलकर शिवसेना तालुका संघटक अनिकेत तेंडुलकर,रमेश हरमलकर,महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ.सिद्धी शिरसाट,सौ.दीक्षा सावंत जिल्हा संघटक रुपेश पावसकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्र्वास गावकर,राजा गावडे,शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर,अरविंद करलकर,अनिकेत तेंडोलकर, देवगड तालुकाप्रमुख अमोल लोके, उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, मालवण तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर,शिवसेना मालवण तालुकाप्रमुख आशा वळप्पी, मालवण शहर प्रमुख भारती घारकर, शिवसेना प्रवक्ता रत्नाकर जोशी, शिवसेना माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद नार्वेकर,शिवसेना उपतालुकाप्रमुख विठ्ठल शिंदे, पंढरीनाथ गुरव, शिवसेना विभागप्रमुख प्रवीण मर्गज, जयदीप तुळसकर, पांडुरंग मेस्त्री,विठोबा शेडगे,उपविभागप्रमुख गिरीश बेलुसे,महिला आघाडी उपतालुकाप्रमुख संगीता खांडेकर,अनघा रांगणेकर,प्रियांका कुमावत,महिला आघाडी विभागप्रमुख सायली राणे, उपविभागप्रमुख पूर्वा पेडणेकर,दर्शन इब्राहीमपूरकर,राजन मेस्त्री,रुपेश नाईक,सुशांत घाडीगावकर यांच्यासह आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech