नाशिक : भयमुक्त नाशिक आणि महाराष्ट्र राज्य करण्यासाठी राज्यातील जनतेला कोणाच्या मदतीची गरज नाहीये शिवसेना व महाविकास आघाडीने जे उमेदवार दिलेले आहेत ते उमेदवार नागरिक निवडून देतील. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते यांच्या प्रचारासाठी आयोजित संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलतांना संजय राऊत म्हणाले. ज्यावेळी शिवसेना अस्तित्वात आली त्यावेळी यांचा जन्मही झाला नव्हता.आणि तरी देखील शिवसेनेवरती हक्क सांगताना लाज कशी वाटत नाही. शिवसेनेच्या जन्मासाठी आम्ही कष्ट घेतले तुरुंगात गेलो आणि आपण आयते शिवसेनेवरती हक्क सांगत आहात असा प्रश्न उपस्थित करून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महायुती वरती जोरदार हल्ला केला आहे. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते यांच्या प्रचारासाठी आयोजित संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याला मार्गदर्शन करताना खासदार संजय राऊत म्हणाले की, भयमुक्त नाशिक आणि महाराष्ट्र राज्य करण्यासाठी राज्यातील जनतेला कोणाच्या मदतीची गरज नाहीये शिवसेना व महाविकास आघाडीने जे उमेदवार दिलेले आहेत ते उमेदवार नागरिक निवडून देतील आणि त्यानंतर संपूर्ण राज्य हे भयमुक्त होईल असे सांगून राऊत यांनी टीका करताना म्हटले आहे की, सर्वजण तुम्हाला वैतागले आहेत. त्यामुळे आता तुम्ही घरीच बसणार आहात. यामध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका नाही आहे. कारण तुम्ही ज्यावेळी महाराष्ट्राचा दौरा करतात त्यावेळी तुम्ही काही ना काही तरी पळून नेतात आणि राज्यातील युवकांचा नागरिकांच्या पोटावरती पाय देतात. या सर्व गोष्टी आता मागच्या दहा वर्षांमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांच्या लक्षात आलेले आहेत.
शिवसेनेचा जन्म झाला त्यावेळी आपण जन्मालाही आलेले नव्हतो याच जाणीव पाहिजे आज आपण ज्या पद्धतीप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावरती दावा केला. त्यावेळी आपल्याला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे होती. आम्ही रक्त सांडले जेलमध्ये गेलो यासारख्या अनेक प्रश्नांना सामोरे गेलो आणि त्यानंतर शिवसेनेचा जन्म झाला शिवसेनेचा जन्म हा मराठी माणसाच्या न्याया हक्कासाठी झालेला आहे. पण आपल्याला तिची साधी जाणीव तरी आहे का आपण त्याच्या जीवावरती मोठे झालो त्याच ताटामध्ये त्याच घरामध्ये आपण भेद केला याची जाणीव झाली आहे का आता तुम्ही त्यांच्याबरोबर आहात तेच तुम्हाला कसे खड्यासारखे बाजूला फेकतात आणि मग आपली अवस्था काय होते. हे तुम्ही स्वतः बघा म्हणजे तुम्हाला कळेल आपण वागलो ते काय होत होते, असा घणाघणात पण त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.