नवी दिल्ली, १६ मार्च : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी आज (शनिवारी) भाजपात प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजपा कार्यालयात दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास त्यांचा पक्षप्रवेश पार पडला.
कोण आहेत अनुराधा पौडवाल?
अनुराधा पौडवाल प्रसिद्ध गायिका आहेत. ९० व्या दशकात बॉलिवूड तसेच भक्तीगीतांनी त्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले होते. त्यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९५४ मध्ये कारवार येथे झाला होता. १९६९ मध्ये अरुण पौडवाल यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. अरुण पौडवाल हे एस.डी. बर्मन यांचे असिस्टंट आणि संगीतकार होते. पौडवाल यांना आदित्य आणि कविता अशी दोन अपत्य होती. त्यातील आदित्यचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला. तर १९९१ मध्ये त्यांच्या पतीचं निधन झाले.