( आनंद गायकवाड )
कल्याण : कोळशेवाडी पोलिस ठाणे हद्दीतील वेस्टर्न रिच इंटरनॅशनल स्कूल चिंचपाडा शाळेतील विद्यार्थ्यांची पोलीस स्टेशन भेट आयोजीत करण्यात आली होती . या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन मधील स्वागतकक्ष, वायरलेस विभाग ,लॉक अप, पोलीस ठाणे अंमलदार कक्ष , पासपोर्ट विभाग, तसेच क्राईम विभाग,अशा विविध विभाग दाखऊन तेथे चालणाऱ्या कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली तसेच त्यांना पोलिस ठाण्यातील हत्यारे दाखवून हत्यारा बाबत माहिती देण्यात आली. याच बरोबर गुड टच, ब्याड टच बाबत देखील सोप्या मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी ११५ विद्यार्थी व ७ शिक्षक उपस्थित होते. पोलिसांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला .