सारंगने, सावलीसाठी तिल्लोत्तमावर चढवला आवाज

0

मुंबई : ‘सावळ्याची जणू सावली’ मालिका एक मनोरंजनक वळण घेत आहे. सावली आणि सारंगच नातं बदलताना दिसत आहे. सावलीच्या सहगायिका म्हणून काम करण्याबाबत मत घेण्यात येतं, आणि सारंगचं सावलीच्या बाजूने असलेलं मत निर्णायक ठरतं. त्यामुळे तिलोत्तमाचा राग अनावर होणार आहे. तर सारंग आईला समजावण्याचा प्रयत्न करतो, सारंग सावलीची माफी मागण्यासाठी धडपडतोय. दरम्यान, हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाच्या तयारीला सुरुवात झालेय, पण कुटुंबीयांमध्ये तणाव आहे. सारंग सावलीला एका कॅफेमध्ये नेऊन माफी मागण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तिलोत्तमाला हे समजल्यावर ती कॅफेमध्ये जाऊन वाद घालते. ती सावलीला सारंगच्या आयुष्यातून कायमची निघून जाण्यासाठी कोऱ्या चेकचा प्रस्ताव देते. यावेळी सारंग प्रथमच आईवर आवाज चढवणार आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी, जगन्नाथ सावलीच्या घरी एका वाईट हेतूने भेट देतो.

ज्यामुळे त्याचा आणि सारंगचा मोठा वाद होणार आहे. कुटुंबातील तणाव तेव्हा वाढतो, जेव्हा जयंती आणि सखा सावलीसाठी भेटवस्तू घेऊन येतात. जयंती ठामपणे सांगते की सावलीने सारंगच्या खोलीत राहावं. इकडे सारंग सावलीची मनापासून माफी मागतो आणि तिचा विश्वास जिंकतो. त्यानंतर, देवा आणि सावली यांची पहिली भेट होणार आहे. पण त्यांच्यात तात्काळ एक विशेष नातं निर्माण होतं. बोलता बोलता देवाला सावली आपली लहान बहीण असल्यासारखी वाटू लागते, तर सावलीला देवामध्ये एक उबदार आपलेपण जाणवतं. त्या दोघांमध्ये अगदी क्षणात गोड संवाद तयार होतो, जणू नशिबानेच त्यांना एकमेकांसाठी जोडून ठेवलं होतं. काय आहे देवा आणि सावलीच कनेक्शन ? जयंती आणखीन काय गोंधळ घालणार ? यासाठी बघायला विसरू नका ‘सावळ्याची जणू सावली’ दररोज संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech