समीर वानखडे यांनी दिव्यांगाना दिली सलामी

0

मुंबई : अधेरी मुंबई येथे शनिवारी संपन्न झालेल्या नूतन गुयगुळे फाउंडेशनच्या ९ व्या राष्ट्रीय ध्येयपूर्ती दिव्यांग सोहळ्यात टॅक्स पेयर सर्विसचे अतिरिक्त महासंचालक मा. समीर वानखडे (IRS) म्हणाले. आम्ही या कार्यक्रमात दिव्यांगांमधील रियल हिरो पाहिले. शारीरिक, मानसिक संघर्ष करता करता या हिरोंनी आपले जीवन जगले आहे, त्यांना मी मनापासून सलाम करतो. असे म्हणून समीर वानखडे यांनी दिव्यांगांचा गौरव केला.

अंधेरी येथील विजय बँक्वेट हॉलमध्ये शनिवारी झालेल्या कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींना ९ वे राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कार देण्यात आले. आपल्या जीवनात संघर्ष करून, यशोशिखर गाठलेल्या दिव्यांग हिरोंना हे सन्मान देण्यात आले. यात एकंद बारा दिव्यांगांना पुरस्कार दिले गेले. यावेळी नूतन गुळगुळे फाउंडेशनला सहकार्य करणाऱ्या सर्वांनी या कार्यक्रमाला आपली हजेरी लावली होती. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मा. जुई मांडके, अभिनेत्री मा. समीरा गुजर, झी २४ तासचे संपादक मा. निलेश खरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग मा. प्रसाद खैरनार, टॅक्स पेयर सर्विसचे अतिरिक्त संचालक मा. समीर वानखडे हे सर्व मान्यवर उपस्थित होते.

प्रसाद खैरनार संवाद करताना म्हणाले, यात ज्या दिव्यांग व्यक्तींना पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील सर्व दिव्यांग कोणत्या ना कोणत्या खेळात आहेत. त्यांनी राष्ट्रीय पातळीवर खेळामध्ये भारताचे नेतृत्व करावे, सहभाग घ्यावा. ते पुढे म्हणाले, मी दिव्यांगांच्या मदतीसाठी नूतन गुळगुळे फाउंडेशनला कायम सहकार्य करणार आहे. या शब्दात खैरनार यांनी गुळगुळे पती पत्नी यांचा गौरव केला. निलेश खरे म्हणाले, मला झी २४ तासच्या माध्यमातून एनजीएफच्या संपर्कात येता आले हे माझे भाग्य आहे. या पुरस्कार मिळवणाऱ्या दिव्यांगांना पाहून मनात एक ऊर्जा निर्माण झाली आहे. या दिव्यांगांच्या जीवनगाथा आपण मीडियाच्या माध्यमातून पुढे आणल्या पाहिजेत. असे खरे यांनी सांगितले. बोलताना ते म्हणाले

बालपणी माझ्या हाताला अल्प प्रमाणात पोलिओ होता. आई-वडिलांच्या अपार मेहनतीमुळे माझ्या हातात ताकद आली. त्यामुळे अपंगांच्या संघर्षाची जाणीव मला आहे. या सगळ्यात एनजीएफला सहकार्य करणाऱ्या कार्ययोगी विभूतींचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याचे निवेदन सुप्रसिद्ध लेखिका नीता माळी यांनी केले. त्यांनी निवेदन करताना दिव्यांग व्यक्तींच्या यथार्थ जीवन गाथा सांगितल्या. एनजीएफ च्या संस्थापक अध्यक्षा नूतन ताईंनी फाउंडेशनच्या कार्याबद्दल संवाद साधला आणि आपल्या स्वानंद सेवासदन या दिव्यांगांच्या वास्तूची माहिती लोकांना करून दिली.

यावेळी त्यांनी सर्वांना सहकार्याचे आवाहन केले. डॉक्टर दुधात यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. स्वानंद सेवा सदन हे सेंटर आदिवासी, गरीब दिव्यांगांचे आहे. यात शून्य ते सतरा वयोगटातील सर्व मुला-मुलींना राहण्याची, प्रशिक्षणाची सोय केली गेली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी नूतन गुळगुळे फाउंडेशनला सत्पात्रीदान द्यावे. या दानाचा सदुपयोग दिव्यांगांकरता केला जाणार आहे. असे ठाण्यातील साहित्यिक रुपेश पवार यांनी ठाण्यातील पत्रकारांना सांगितले आहे.

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech