समाजवादी पक्ष पुण्यातील हडपसर विधानसभा मतदार संघातून मैदानात

0

पुणे – भारतीय जनता पक्षाच्या धर्मांध राजकारण देशाला विघातक आहे. मुस्लिम समाज भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये भीतीच्या वातावरणात जगत असून सर्वधर्मसमभावाची भावना ठेवून विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी आम्ही महाराष्ट्र विकास आघाडी सोबत आहोत. पुण्यातील हडपसर विधानसभा मतदार संघामध्ये समाजवादी पक्षाची ताकद असून या मतदार संघात उमेदवार उभा केल्यास निश्चितच येथून समाजवादी पक्षाचा आमदार निवडून येईल अशी आशा व्यक्त करतानाच समाजवादी पक्ष हडपसर विधानसभा मतदार संघा सह महाराष्ट्रात विधानसभेच्या 12 जागा लढवणार असल्याची माहिती समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आजमी यांनी दिली.

समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव अनिस अहमद यांच्या हडपसर विधानसभा मतदार संघाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अबू आजमी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सलीम मुल्ला, हबीब शेख, इमरान शेख, असिफ शेख यांसह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सलीम मुल्ला यांच्यासह शेकडो एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी यावेळी अबू आझमी यांच्या उपस्थितीत झालेल्या जनसंवाद सभेमध्ये समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech