साहू तेली समाज कल्याण सेवा संस्थेतर्फे मेगा रक्तदान शिबीर संपन्न

0

डोंबिवली – दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त साहू तेली समाज वेलफेयर सेवा महाराष्ट्र प्रदेश संस्थेतर्फे मेगा रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 ते 9 वाजेच्या दरम्यान डोंबिवलीतील आदर्श विद्यालय येथे करण्यात आले होते. सुमारे 85 जणांनी रक्तदान केले आणि शेकडो लोकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. तुमचे रक्तदान एखाद्यासाठी जीवनदान ठरू शकते. तुमचे रक्तदान एखाद्यासाठी जीवनदान ठरू शकते. मानवतेच्या या महान कार्यात जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले. शेकडो लोकांनी रक्तदान करून हे महा रक्तदान शिबिर यशस्वी केले व मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

यावेळी दोस्ताना जनसेवा ग्रुप, धडकेबाज युवा प्रतिष्ठान, हिंदी भाषा जनता परिषद, भारतीय साहू तेली समाज, साहू सेवा संघ उल्लासनगर संस्था, राजाजी पथ गणेश मित्र मंडळ डोबिवली, संकट मोचन हनुमान मंडळ, साहू तेली वेलफेअर आदी संस्थांचे सहकार्य लाभले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक मुकुंद (विशू) पेडणेकर, साहू तेली समाज वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष मोहन गुप्ता, सचिव रतिलाल गुप्ता, ज्येष्ठ समाजसेवक मोहन गुप्ता, भाजपचे भडक सेन्सॉर बोर्ड सदस्य रमाकांत गुप्ता, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे भूषण चव्हाण उपस्थित होते. तसेच शिवसेना पदाधिकारी सागर दुबे , सामाजिक कार्यकर्ते सुनील गुप्ता, नरेंद्र नवल तेली, मनोज गुप्ता , अध्यक्ष : अशोक गुप्ता , शिवलाल साहू , संजीव गुप्ता , राजू प्रसाद गुप्ता , नीरज गुप्ता , साहेबलाल, शिवलाल शाहू , महिला अध्यक्षा मीना गुप्ता , संगीता गुप्ता, आरती गुप्ता, मुन्नी गुप्ता, रीना गुप्ता यांच्यासह इतर संस्थांचे लोक उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech