महाविकास आघाडीची ‘मातोश्री’वर महत्त्वाची बैठक

0

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबत ‘मातोश्री’वर महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत उमेदवारांबाबत यशस्वी चर्चा झाली. ही बैठक सुमारे 2 तास चालली, ज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या मुहूर्तावर प्रमुख नेत्यांची ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीबाबत महाविकास आघाडीची रणनीती काय असेल यावर चर्चा झाली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech