ख्यातनाम दिग्दर्शक श्याम बेनेगल कालवश

0

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे आज, सोमवारी 23 डिसेंबर रोजी निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते 91 वर्षांचे होते. श्याम बेनेगल हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. बेनेगल यांना भारत सरकारने 1976 मध्ये पद्मश्री आणि 1991 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. श्याम बेनेगल यांचा जन्म 14 डिसेंबर 1934 मध्ये तत्कालिन आंध्रप्रदेशच्या सिकंदराबाद येथे झाला होता. कॉपी रायटर म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. नंतर आपल्या मेहनतीने आणि कामाच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे स्थान मिळवले. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान विसरता येणार नाही. श्याम बेनेगल यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात येण्यापूर्वी अनेक गोष्टी केल्या आहेत. त्यांनी प्रथम अर्थशास्त्राचा अभ्यास केला. त्यांना फोटोग्राफीची खूप आवड होती. जेव्हा ते 12 वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी त्यांचे वडील श्रीधर बी. बेनेगल यांच्यासाठी कॅमेरावर पहिला चित्रपट बनवला होता.

श्याम बेनेगल यांनी 1974 मध्ये त्यांच्या चित्रपट दिग्दर्शनाची सुरुवात केली. ‘अंकुर’ नावाचा चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली. हा त्यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला पहिला चित्रपट होता. बेनेगल यांनी 1986 मध्ये टीव्हीच्या दुनियेतही प्रवेश केला. त्यांनी ‘यात्रा’ ही मालिका दिग्दर्शित केली. त्याच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये निशांत, ‘मंथन, भूमिका, मंडी, कोंडुरा सारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.चित्रपटांसोबतच त्यांनी अनेक माहितीपट आणि जाहिरात चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांना 1976 मध्ये पद्मश्री आणि 1991 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. त्यांना 2005 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

बेनेगल यांनीही भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक मौल्यवान अभिनेते आणि अभिनेत्री दिल्या. ज्यात नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, अमरीश पुरी, अनंत नाग, गिरीश कर्नाड, शबाना आझमी, स्मिता पाटील यांसारखे दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. चित्रपटांशिवाय दूरदर्शनवरील ‘भारत एक खोज’ आणि ‘कहता है जोकर’, ‘कथा सागर’ या प्रसिद्ध मालिका श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केल्या. बेनेगल यांनी त्यांचे गुरू सत्यजित रे आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावरही डॉक्युमेंट्री बनवल्या.श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांना 8 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. झुबैदा, द मेकिंग ऑफ द महात्मा, नेताजी सुभाषचंद्र बोस: द फॉरगॉटन हीरो, मंडी, आरोहण, वेलकम टू सज्जनपूर यांसारख्या अनेक उत्तम चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. त्यांच्या चित्रपटांना 8 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. शायन बगेनल यांना दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech