मुंबई – माॅरिशस मराठी मंडळी फेडरेशन तर्फे माॅरिशस मधील ग्लेन पार्क विघ्नेश्वर मंदिर येथे गणेश चतुर्थी राष्ट्रीय सोहळा-२०२४ चे भव्य असे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार, दैनिक ‘महाराष्ट्र जनमुद्रा’चे संपादक डाॅ. दीपक दळवी संपादित मराठी – इंग्रजी आरती संग्रहाचे प्रकाशन माॅरिशसचे पंतप्रधान प्रविण्दकुमार जुगनाॅथ यांच्या हस्ते करण्यात आले. छायाचित्रात डावीकडून वाक्वास-फिनिक्स पालिकेचे महापौर राॅय माईक मॅन्र्फेड मुंगूर, ग्लेन पार्क विघ्नेश्वर मंदिराचे अध्यक्ष प्रीयेशराव बापू, माॅरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे अध्यक्षअसांत गोविंद (सीएसके), माॅरिशस चे पंतप्रधान प्रविण्दकुमार जुगनाॅथ, माॅरिशसचे वाहतूक आणि रेल मंत्री अँलन गनू (जीसीएसके), खासदार अँशले इट्टू, माॅरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष अर्जुन पुतळाजी, मराठी स्पिकिंग युनियनचे अध्यक्ष नितीन बापू उपस्थित होते.