घवघवीत यशानंतर सुद्धा शासकीय सन्मान नसल्याची खंत – अमोल पालेकर

0

नाशिक : तीन क्षेत्रामध्ये घवघवीत यश आणि कामगिरी करूनही शासकीय सन्मान मिळाला नाही ही अस्वस्थता व्यक्त करीत ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर म्हणाले की आर्थिक यश हे माणसाला मोजण्याचे परिणाम नव्हे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने मनुष्री पब्लिकेशन प्रकाशित ऐवज एक स्मृतिबंध या आत्मकथनाच्या प्रकाशनाच्या निमित्याने अमोल पालेकर हे मुलाखत देत होते ही मुलाखत प्राध्यापक वृंदाबारकावी यांनी घेतली यावेळी त्यांच्या समावेत क्युरेक्टर संध्या गोखले, मधुश्री प्रकाशनाचे शरद अष्टीकर कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे लोक शेवडे विलास लोणारी हेदेखील उपस्थित होते.

यावेळी प्रकट मुलाखतीमध्ये बोलताना अमोल पालेकर यांनी काही विषयांवर ती नाराजी व्यक्त केली ते म्हणाले की तीन क्षेत्रात मी घवघवीत कामगिरी केली तरी देखील शासनाने मला एकही सन्मान दिला नाही त्यामुळे मी अस्वस्थता व्यक्त करीत म्हणाले की इंदिरा गांधींच्या काळामध्ये घोषित आणीबाणी होती तर सध्या अघोषित परिस्थिती आहे त्यामुळे त्यावर पुढे काय बोलण्यात उपयोग नाही. असे सांगून ते पुढे म्हणाले की मी माझ्या बंगल्याचे नाव चिरेबंदी ठेवले आहे त्याचे कारण आता सांगायचे तर आजपर्यंत कधीही इन्कम टॅक्स रेड माझ्यावर झाली नाही त्यामुळे मी सुरक्षित आहे.

या सरकारच्या विविध प्रश्नांवर बोलून अमोल पालेकर पुढे म्हणाले की मी नास्तिक आहे त्याचा फायदा मला झाला सर्वपित्री अमावस्येला कोणी चित्रपट प्रदर्शित करीत नाही त्यामुळे मला सहज थेटर मिळते आणि मी माझा चित्रपट प्रदर्शित करतो. असे सांगून ते पुढे म्हणाले की लोकांना जे आवडते ते परत देणे ही यशाची गुरुकिल्ली आहे पण आर्थिक यश माणसाला मोजण्याचे परिणाम नव्हे असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech