मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने २२ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत मुंबई उच्च न्यायालयाचे वकील प्रवीण शेषराव पाटील यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे, असे सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या कॉलेजियमच्या निवेदनात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने अधिवक्ता प्रवीण शेषराव पाटील यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी बढती देण्याची शिफारस केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशांची मंजूर पदे ९४ आहेत. मात्र सध्या ६७ न्यायाधीशांची नियुक्ती आहे. त्यामुळे अजून २७ पदे रिक्त आहेत. मुंबई उच्च न्यायालयाव्यतिरिक्त, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने २२ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत अलाहाबाद, राजस्थान आणि उत्तराखंड या अन्य तीन उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या नियुक्तीला मान्यता दिली.