‘रिसेप्शन’ हा लग्नविधी नाही! मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा

0

मुंबई – लग्नाचे रिसेप्शन म्हणजे स्वागत समारंभ हा लग्नविधीचा भाग नाही,असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान दिला. एका घटस्फोटासंबंधीच्या प्रकरणाची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयातील न्या. राजेश पाटील यांच्या एकल पिठाने असे स्पष्ट केले की, हिंदू विवाह कायद्यानुसार लग्नानंतर आयोजित केले जाणारे रिसेप्शन किंवा स्वागत समारंभ हा विवाह विधीचा भाग मानता येत नाही.

या प्रकरणातील दाम्पत्य हे अमेरिकेत वास्तव्यास होते. केवळ दहा दिवसांसाठी ते मुंबईत वास्तव्यास होते. दाम्पत्याने राजस्थानमध्ये हिंदू वैदिक पध्दतीने विवाह केला . केवळ मुंबईमध्ये या दाम्पत्याने पाहुणे आणि मित्र परिवारासाठी स्वागत समारंभ आयोजित केला होता.हे लक्षात घेता पतीने मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज विचारात घेता येणार नाही,असा स्पष्ट निर्वाळा न्यायालयाने दिला.

या दाम्पत्याने हिंदु वैदिक पध्दतीने २०१५ मध्ये राजस्थानच्या जोधपूरमध्ये विवाह केला होता.लग्नानंतर चार दिवसांनी त्यांनी मुंबईमध्ये स्वागत समारंभ आयोजित केला होता.त्यानंतर काही दिवस हे दाम्पत्य मुंबईत राहिले आणि नंतर अमेरिकेला निघून गेले होते.२०१९ साली दाम्पत्यामध्ये काही कारणांवरून भांडणे होऊ लागल्याने पतीने मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.तो अर्ज कौटुंबिक न्यायालयाने फेटाळला. दरम्यान, पत्नीने चार महिन्यांनी पत्नीनेही अमेरिकेतील कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.पत्नीने मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात पतीने दाखल केलेल्या घटस्फोटाच्या याचिकेला आक्षेप घेतला होता. पत्नीची ती याचिका कौटुंबिक न्यायालयाने फेटाळल्यानंतर पत्नीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने पत्नीचा आक्षेप मान्य करून पतीची याचिका फेटाळली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech