राष्ट्रीय समाज पक्ष विधानसभेला २८८ ठिकाणी स्वबळावर……?

0

महादेव जानकर यांची घोषणा….

मुंबई -अनंत नलावडे

“रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही.त्यामुळे आपण आणखी किती दिवस एखाद्याच्या आश्रयाखाली राहायचं? त्यापेक्षा आपणच आपली तयारी केली पाहिजे.”असे सांगत आम्ही महायुतीमध्ये आहोत की नाही हेच माहिती नसल्याने राष्ट्रीय समाज पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यभरात सर्वच २८८ जागा लढवणार, अशी थेट घोषणाच सत्ताधारी महायुती सरकारमधील एक मित्र पक्ष असलेल्या महादेव जानकर यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून महायुती तसेच महाविकास आघाडी दोन्हीकडे कुरबुर मोठ्या प्रमाणावर सुरू असतानाच महायुतीचा एक भाग असलेले महादेव जानकर यांनी थेट स्वबळाची भूमिका जाहीर केल्याने आतापासूनच विधानसभेच्या या होवू घातलेल्या निवडणुकांतील चुरस अधिक रंगतदार होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

खरंतर लोकसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे नाराज होते.त्यातच त्यांना परभणीतून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षासोबत बोलणीही झाली असल्याचे सांगितले जायचे.मात्र महायुतीने त्यांची समजूत काढली आणि त्यांना परभणीतूनच उमेदवारी दिली.मात्र उमेदवारी मिळाली खरी मात्र जानकरांना या मतदारसंघातून विजय मिळवता आला नाही.त्यामुळेच जानकरांनी नाराजीचे अस्त्र पुन्हा एकदा उपसल्याचे त्यांच्या एकंदरीत भुमिकेवरून स्पष्ट होत असल्याचे मानले जाते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech