मुंबई : अहिल्यानगर येथील रणजित परदेशी यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या राज्य कार्यकारणी सदस्यपदी निवड करण्यात आली. राज्यातील पदाधिकारी यांची बेठक ठाणे येथे आयोजित करण्यात आली होती.यामध्ये हि निवड करण्यात आली. यापूर्वी रणजित परदेशी हे जिल्हा संपर्कप्रमुख होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याध्यक्ष रामहरी राऊत यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी सचिव प्रथमेश पाटील, माउली धुळगुंडे,निखिल बुडजडे आदी उपस्थित होते.
त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक रुग्णांना मदत मिळवून दिली.तसेच अनेकांना हॉस्पिटलच्या बाबतीत मदत कक्षाच्या माध्यमातून माहिती देत होते.अनेकांचे ऑपरेशन मोफत सुद्धा झाले होते. त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांना आता राज्याच्या कार्यकारणीवर काम करण्याची संधी मिळाली. तसेच आता या पुढेही शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोर-गरीब आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मदाय रुग्णालयात ( १० टक्के) राखीव खाटा उपलब्ध देणे,निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पूर्णतः मोफत किंवा सवलतींच्या दरात शस्रक्रिया मोफत करणे,महात्मा फुले जण आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयामध्ये गरजू रुग्णांना शस्रक्रिया मोफत करणे संदर्भात सदैव मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.