राहुल नार्वेकर यांचा विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

0

मुंबई : नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होतील. राहुल नार्वेकर हे यंदा मंत्रि‍पदासाठी इच्छूक होते. मात्र, त्यांची ही इच्छा अधुरीच राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांच्यासोबत मुंबईतून आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा हे नेतेही मंत्रि‍पदाच्या शर्यतीमध्ये आहेत. त्यामुळे मंत्रि‍पदाची संधी कोणाला मिळणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. महायुतीकडे असलेल्या प्रचंड संख्याबळामुळे नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावरील निवड ही केवळ औपचारिकता मानली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सदस्य अॅड. राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी विधिमंडळ सदस्य तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सदस्य चंद्रकांतदादा पाटील आदी उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech