संभलला जाणाऱ्या राहुल गांधींना गाझीपूर सीमेवर अडवले

0

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशच्या हिंसाचारग्रस्त संभल शहराला भेट देण्यासाठी निघालेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांना दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस-वेवरच्या गाझीपूर सीमेवर रोखण्यात आले. त्यांना संभलला जाण्यासाठी मनाई करण्यात आली. त्यामुळे राहुल आणि प्रियंका यांना परत यावे लागले. तसेच दिल्ली-संभल मार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले होते. दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेवर वेगवेगळ्या ठिकाणी, विशेषत: दिल्लीला नोएडाशी जोडणाऱ्या गाझीपूर सीमेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी प्रशासनाने राहुल, प्रियंका आणि त्यांच्यासह आलोल्या काँग्रेस नेत्यांना अडवले. त्यामुळे राहुल गांधींना दिल्‍ली-उत्तर प्रदेश सीमेवरुन माघारी परतावे लागले. दरम्यान या कारवाईनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्‍हणाले की, आम्ही संभलला शांततेने जात होतो, पण आम्हाला रोखले गेले. संभळमध्ये दंगल झाली होती, त्यामुळे आम्ही तिथे जात आहोत. आम्हाला तिथे जाण्याचा अधिकार असल्याचे जयराम रमेश यांनी सांगितले. संभल येथे कोर्टाच्या आदेशानंतर एएसआयच्या टीमने मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी भेट दिली असता मुस्लिम समाजाने या सर्वेक्षणास विरोध करत हिंसाचार केला. या हिंसाचारात चौघांचा मृत्यू झाला असून अनेक पोलिस कर्मचारी जखमी झालेत.

या विषयावरून समाजवादी पार्टी आणि काँग्रेस सातत्याने राज्य आणि केंद्र सराकरवर टीका करीत आहे. तसेच राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांनी बुधवारी हिंसाचारग्रस्त संभल शहराला भेट देण्याची योजना आखली होती. नियोजीत कार्यक्रमानुसार राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा सकाळी 10.15 वाजता दिल्लीहून निघाले. हे लोक दुपारी 1 वाजेपर्यंत संभल येथे पोहचण्याची शक्यता होती. त्यांच्यासोबत उत्तरप्रदेशातील काँग्रेस खासदारांचा एक गट देखील होती. परंतु, संभल प्रशासनाने राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांना संभल शहरात प्रवेश करण्यापासून रोखावे अशी सूचना शेजारच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना केली. त्यानुसार बुलंदशहर, अमरोहा, गाझियाबाद आणि गौतम बुद्ध नगर येथील अधिकाऱ्यांना पत्र लिहून सीमेवर राहुल गांधी यांना थांबवण्याचे आवाहन केले. संभलच्या दिशेने जाणाऱ्या राहुल गांधींच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech