मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीसोमवारी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. परभणी येथे दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी परभणी दौऱ्यावर येणार आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत. तसेच राहुल गांधी आगामी 10 जानेवारी 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी या गावालाही भेट देणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर निवडणुकीच्या निकालावरून मारकडवाडीमध्ये झालेले आंदोलन देशभर चर्चेचा विषय ठरले आहे. याची दखल विरोधी पक्षातील सर्व नेत्यांनी घेतली होती, त्या गावातही राहुल गांधी जाणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली. त्यानंतर आगामी 10 जानेवारीला सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावाला देखील राहुल गांधी भेट देणार आहेत. परभणी हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी अटक केल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता.