आसनगाव/कल्याण – प्रफुल्ल शेवाळे
उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन प्रवासी संघटनाच्या वतीने गुरुवारी आसनगाव स्थानकात काळया फिती बांधून प्रवाशांनी आंदोलन पुकारले या आंदोलनात सुमारे दहा ते बारा हजारांहून अधिक प्रवाशांनी समर्थन देत आंदोलकांना उदंड प्रतिसाद देऊन पाठिंबा दिला. ढिसाळी झोपलेल्या रेल्वेला प्रशासनाला जागवण्यासाठी काळी फित आणि पांढरा शर्ट, कुर्ता घालून आसनगाव येथे गुरूवारी सकाळी ७ ते १० दरम्यान रेल्वे प्रवाशांनी आसनगाव स्थानकात मोठया प्रमाणात एकत्र येत काळया फिती बांधून आंदोलन केले. या आंदोलनामध्ये प्रवाशी संघांच्या वतीने विविध शांततामय पद्धतीने मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या.कल्याण कसारा कर्जत मार्गांवर लोकल वाढविणे, मेल एक्सप्रेस गाडयांना बाजूला ठेवून लोकल गाड्या वेळेवर चालवणे, जादा फेर्या सोडणे, ठाणे कर्जत, कसारा शटल सेवा द्या, आसनगावं होम प्लॅटफॉर्म, आसनगावं पादचारी पूल, कल्याण कसारा तिसरी चौथी मार्गीका, महिला विशेष लोकल सोडा रेल्वेने प्रवास करतांना लोकल वेळेवर धावत नसल्याने प्रवाशांना जीवावर उद्धार होवून प्रवास करतात. रेल्वे प्रशासन कायमच प्रवाशांना जीवाशी खेळ खेळत असल्याचे रेल्वे पोलिसांनी नुकत्याच दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. रेल्वे रोज मृत्यूमुखी पडणाऱ्यांची माहिती भयावह आहे. हे ज्वलंत वास्तव आपल्या लक्षात येईल. दीर्घकाळ रखडलेले पायाभूत सुविधा प्रकल्प, प्रवाशांच्या तुलनेत न वाढणार्या लोकल फेर्या, मेल एक्स्प्रेस माल गाड्या यांना प्राधान्य देऊन ऐन गर्दीच्या वेळेतच सातत्याने लोकल उशिराने चालविणे, अशा विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन प्रवासी संघटनेच्या निषेध आंदोलनाप्रसंगी मा.आमदार पांडुरंग बरोरा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ठाणे महिला ग्रामीण अध्यक्ष विदयाताई वेखंडे यांनी आसनगाव रेल्वेस्थानक येथे भेट देली व रेल्वे प्रशासनाचा निषेध व्यक्त करत, प्रवासी संघटनेच्या निषेध आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला. तसेच हजारो रेल्वे प्रवाशांनी स्वतः काळी फीत लावून निषेध नोंदविला. यावेळेस आम्ही तुमच्या सोबत आहोत,असं म्हणत प्रवाशांनी असा उत्स्फूर्त पाठींबा नागरिकांनी दिला. यामध्ये युवा वर्ग, महिला, दिव्यांग बांधवांनी स्वतःहून पुढे येत सहकार्य केले. रेल्वे पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस,लोहमार्ग पोलीस यांनीही सहकार्य करून संघटनेला एकप्रकारे पाठिंबाच दिला असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत होती.
या अभियानामध्ये महासंघ सरचिटणीस जितेंद्र विशे, कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजरचे अध्यक्ष शैलेश राऊत, संघटनेचे प्रसिद्ध प्रमुख महेश तारमळे, मीना फर्डे, अनिता झोपे, ज्ञानेश्वर चंदे, अजय गावकर पत्रकार प्रफुल्ल शेवाळे,रेल्वे संघटनेचे पदाधिकारी, उद्योजक रविशेठ पाटील,रेल्वे पोलीस प्रशासन, शहापूर पोलीस प्रशासन कर्मचारी, आदी मान्यवर व रेल्वे प्रवासी उपस्थित राहून सदर उपक्रमामध्ये सहभागी झाले होते.