मुरबाड – तालुक्यात सध्या विधानसभेचे वेध लागल्याने महिलांना देवदर्शन यात्रेवर भर दिला जातोय ,मतदारांना जेवणावळीत्या पंक्ती घडवून आणल्या जात असल्या तरी मुलभूत सोईसुविधा पासून वंचित जनतेच्या समश्या सोडविण्यास बाबत भाजपा, शिंदे गटाला, काहीही सोयरसुतक नाही, तालुक्यातील दोनशे चार गावातील सुमारे १२६ ग्रामपंचायतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुरबाड पंचायत समितीत कार्यरत असणारे तीन विस्तार अधिकाऱ्या पैकी दोन सेवानिवृत्त व एक वैद्यकीय रजेवर तसेच सहायक गटविकास अधिकारी देखील सेवानिवृत्त आणि कार्यालयीन अधीक्षक नसल्याने त्या ग्रामसेवकावर नियंत्रण ठेवणार कोण ? व ग्रामस्थांना मुलभूत सुविधा देणार कोण ? हा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
मुरबाड तालुक्यातील १२६ ग्रामपंचायत मधील बेघर, अंपग, विधवामहिलांना, पंतप्रधान आवास योजना,शबरी,रमाई, अशा विविध योजनेतुन किमान तीन ते चार हजार लाभार्थीना घरकुल मंजूरी झाली आहेत, मुळातच दारिद्ररेषेतील लाभार्थी असल्याने त्या कडे पैसा कुठून असणार ? घरकुल मंजूर झाल्याने या लाभार्थीनी उसणवारी व उधारीवर विटा, सिंमेंन्ट, कामगारांची मजूरी दिली, घरकुलासाठी शासन १लाख ४० हजार रुपये देते, त्यात देखील ज्यो त्या (घराचादगडीपाय) बांधण्यासाठी १५ हजार, बांधकामाला ४५ हजार व झोपडी बांधून पुर्ण झाली की संबधीत विभागाचा ईंजिनियर काम तपासून तपासून कामपुर्ण असेल तर उर्वरित रक्तम दिली जाते, असे असले तरी तालुक्यातील ह्या झोपड्या लाभार्थिनी पुर्ण करून सहा महिने उलटले तरीही निधी उपलब्ध होत नसल्याने या लाभार्थीना अर्थिक विवंचनेला सामोर लाव लागत आहे,घरकूल तयार झाल मात्र रक्कम मिळाली नसल्याने घरकुलावर पत्र्याऐवजी प्लास्टीकचा आधार घ्यावा लागतोय.
घरकुलावर पत्रे नसल्याने दुस-यांच्या घराचा आसरा घेऊन पावसाळा काढायची वेळ ह्या लाभार्थीवर येऊन ठेपली आहे,या लाभार्थीना कोणी ही वाली नसल्याने त्यांचा हक्काचा निधी पदरात पडत नसला तरी येत्या हप्त्या भरात या लाभार्थीना त्यांची हक्काची रक्कम मिळाली नाही तर जिल्हाधीकार्यालया समोर लाभार्थाचा हंडी -भांडी संसार मांडून न्यायासाठी उपोषणाचा ईशारा महाराष्टराज्य अदिवासी क्रांतीसेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भांगले यांनी दिला आहे,