मणिपूरमध्ये पोलीस, आमदारांच्या घरांची तोडफोड, 8 उग्रवाद्यांना अटक

0

इम्फाल : मणिपूरमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसक घटनांनंतर, मैतेई संघटनेचे आरामबाई टेंगोलचे प्रमुख कोरो नगानबा खुमान आणि कुकी संघटनेचे प्रमुख एनआयएच्या रडारवर आहेत. एनआयए मणिपूरमध्ये सुरक्षा दलांवर हल्ले आणि आयईडी स्फोटांच्या 4 प्रकरणांचा तपास करत आहे. यामध्ये इम्फालमधील फर्स्ट मणिपूर रायफल्स कॅम्पसमधून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा लुटणे, मोरेहमधील एका पोस्टवर हल्ला आणि बिष्णुपूरमध्ये आयईडी स्फोट यांचा समावेश आहे. मणिपूरमध्ये पोलीस आणि आमदारांच्या घरांची तोडफोड आणि जाळपोळ केल्याप्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे.

गेल्या 11 नोव्हेंबर रोजी जिरीबाममध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत कुकी दहशतवाद्यांनी सहा जणांचे अपहरण केले होते. त्यानंतर झालेल्या चकमकीत 10 कुकी बंडखोरही मारले गेले. गृह मंत्रालयाने नुकतेच एनआयएला या चारही प्रकरणांची चौकशी करण्यास सांगितले आहे. सुप्रीम कोर्टाने ही केसेस इंफाळच्या एनआयए कोर्टातून गुवाहाटीच्या एनआयए स्पेशल कोर्टात हस्तांतरित केली आहेत. मैतेई समुदायातील 6 महिला आणि मुलांचे मृतदेह नदीत सापडल्यानंतर संतप्त जमावाने इंम्फाल खोऱ्यात अनेक आमदारांच्या घरांची तोडफोड केली होती. यापूर्वी 16 नोव्हेंबरला इंफाळ पश्चिमच्या पाटसोई पोलिसांनी आमदारांच्या घरांना आग लावल्याप्रकरणी एका आरोपीला अटक केली होती.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech