बदलापुर – बदलापुरातील एका शाळेत दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात आरोपीला फाशीची मागणी करणाऱ्या आंदोलकांनी आज (२०)बदलापुर रेल्वे स्थानकावर मोठे आंदोलन केले. या निषेध सभेमुळे सकाळी ८ वाजल्यापासून रेल्वे वाहतूक ठप्प झाली. आंदोलकांनी १० तास रेल्वे सेवेत अडथळा आणला. त्यामुळे संध्याकाळी ६ वाजता पोलिसांनी लाठीचार्ज केला.
या आंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला. अंबरनाथ ते खोपोली दरम्यान ३० लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या. ११ लोकल गाड्या डायव्हर्ट करण्यात आल्या. मुंबईहून कोल्हापूरला जाणारी कोयना एक्सप्रेस कल्याणवरून वळविण्यात आली. कर्जत-पनवेल-ठाणे दरम्यान १० मेल-एक्सप्रेस गाड्या वळवण्यात आल्या आणि अंबरनाथ ते कर्जत रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाला होता.