पंतप्रधानांच्या हस्ते तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण

0

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (बुधवारी) मुंबईच्या नौदल डॉकयार्डमध्ये ‘आयएनएस सुरत’, ‘आयएनएस नीलगिरी’ आणि ‘आयएनएस वाघशीर’ या तीन युद्धनौका राष्ट्रार्पण केल्या. तिन्ही युद्धनौकांची बांधणी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे करण्यात आली आहे. मुंबईत आगमन झाल्यावर पंतप्रधानांना नौदलाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते.
‘आयएनएस वाघशीर’ : पी ७५ स्कॉर्पीन प्रकल्पातील सहावी आणि अंतिम प्रकारातील पाणबुडी आहे. फ्रान्स नौदलाच्या समूहाच्या सहकार्याने तिची बांधणी करण्यात आली आहे. या तिन्ही युद्धनौकांमुळे भारतीय नौदल अधिक सुसज्ज होणार आहे.

‘आयएनएस सुरत’ : जगातील सर्वांत मोठी युद्धनौका : ‘आयएनएस सुरत’ हे पी१५बी मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक प्रकल्पाचे चौथे आणि शेवटचे जहाज आहे. जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अत्याधुनिक विनाशकांपैकी एक हे जहाज आहे. यातील ७५ टक्के सामग्री स्वदेशी आहे. ‘आयएनएस निलगिरी’ : हे पी१७ए स्टेल्थ फ्रिगेट प्रकल्पातील पहिले जहाज असून भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन विभागाने त्याची निर्मिती केली आहे. तसेच त्यात उत्कृष्टपणे संकटकाळी तगून रहाण्याची क्षमता असून सागरी सुरक्षा आणि स्टील्थसाठी प्रगत वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech