गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी

0

मुंबई : प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी नियंत्रण करणे आणि स्थानक परिसरात प्रवाशांची सुरळीत हालचाल सुनिश्चित करणे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर विभागातील काही प्रमुख स्थानकावर 2 ते 9 डिसेंबर दरम्यान प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.दरम्यान, सुरळीत आणि सुरक्षित प्रवास अनुभवण्यासाठी प्रवाशांनी नियोजन करावे आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रवास सुलभ व्हावा यासाठी जेष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्या लोकांना या निर्बंधमधून सूट देण्यात आली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech