तुमच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास : नवाज शरीफ

0

इस्लामाबाद – लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला बहुमत मिळाले आणि काल मोदी सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन)चे प्रमुख नवाझ शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे. नवाझ शरीफ म्हणाले की, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशावरुन लोकांचा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे दिसून येते.

नवाझ शरीफ यांनी सोशल मीडिया साइट वर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की तिस-यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल मी मोदीजींचे हार्दिक अभिनंदन करतो. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तुमच्या पक्षाला मिळालेल्या यशावरून तुमच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास असल्याचे दिसून येते. आता द्वेषाचे आशेत रुपांतर करुया आणि दक्षिण आशियातील दोन अब्ज लोकांचे नशीब घडवण्याच्या संधीचे सोने करूया.

पाकिस्तानचे पंतप्रधान आणि नवाझ शरीफ यांचे भाऊ शाहबाज शरीफ यांनीदेखील पीएम मोदींचे अभिनंदन केले आहे. मात्र, त्यांचा अभिनंदनाचा संदेश अधिक औपचारिकता होता. शाहबाज शरीफ यांनी ट्विटमध्ये लिहिले की, भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech