नवी दिल्ली – लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज आज, शुक्रवारी अनिश्चित काळासाठीतहकूब करण्यात आले. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
केंद्रीय मंत्री रिजीजू म्हणाले की, अर्थसंकल्प मंजूर करण्यासोबतच 18 व्या लोकसभेच्या दुसऱ्या सत्रात भारतीय विमान विधेयक-2024 मंजूर करण्यात आले. या कालावधीत 12 विधेयके मांडण्यात आली. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलै रोजी सुरू झाले आणि 9 ऑगस्ट रोजी संपले. या काळात लोकसभेत चार आणि राज्यसभेत तीन विधेयके मंजूर झाली. जम्मू-काश्मीर विनियोग विधेयक, विनियोग विधेयक 2024, वित्त विधेयक 2024 दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले. इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकही दिवस वाया गेला नाही.