मुंबई : ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात लहान मुलांचे शोषण सुरू आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या टोळ्यांना “एशियन ग्रुमिंग गँग” म्हंटले जाते. लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीला ग्रुमिंग गँग म्हटले जाते. ब्रिटनमधील ग्रुमिंग गँगमध्ये बहुतेक गुन्हेगार पाकिस्तानी वंशाचे पुरुष असल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्रिटनमधील राजकीय कार्यकर्ते टॉमी रॉबिन्सन यांनी २०१८ मध्ये असा दावा केला होता. शिवसेना उबाठा गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या शब्दावर आक्षेप नोंदवत त्यांना “पाकिस्तानी ग्रुमिंग गँग” म्हणावे असे ट्विट केले आहे. ट्वीटरचे (एक्स) मालक एलन मस्क यांनी चतुर्वेदींच्या पोस्टचे समर्थन केले आहे.
पाकिस्तानी वंशाच्या पुरुषांकडूनच प्रामुख्याने ब्रिटिश मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे त्यांनी सांगितले. त्या एशियन ग्रूमिंग गँग नसून पाकिस्तानी ग्रूमिंग गँग असल्याचे खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हंटले आहे. त्यांच्या या एक्स पोस्टवर स्पेस एक्स आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एलन मस्क यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्या विधानाचे समर्थन करत ते खरे असल्याचे म्हटले आहे. “या शतकातच ब्रिटननमधील प्रत्येक मोठ्या शहरात प्रामुख्याने पाकिस्तानी पुरुषांनी सुमारे २.५ लाख ब्रिटिश मुलांवर सामूहिक बलात्कार केला आहे”. रॉबिन्सनला एकांतवासात ठेवण्यात आले आहे. एनल मस्क यांनी त्याची सुटका करण्याची मागणी केली आहे. रॉबिन्सन यांनी ग्रूमिंग गँग्सवर लिहिलेला सायलेन्स्ड या माहितीपटावर ब्रिटनमध्ये बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, ब्रिटनमधील बाल शोषणासाठी संपूर्ण आशियाला जबाबदार धरता येणार नाही. परंतु त्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरता येईल.