मुख्यमंत्र्यांच्या वतीने पंढरीतील लाखो भाविकांना तीन दिवस मोफत भोजनाचे आयोजन

0

सोलापूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने आषाढी वारीदरम्यान पंढरीतील लाखो भाविकांना स्वखर्चातून १६ ते १८ जुलै असे सलग तीन दिवस मोफत भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी आषाढी यात्रा कालावधीमध्ये पाच लाख भाविकांनी भोजनाचा लाभ घेतला होता.

त्यामुळे यावर्षीही जास्तीत जास्त भाविकांना भोजनाचा लाभ मिळावा यासाठी शिवसेनेचे सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे आणि ठाणे महापालिका स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांच्या देखरेखीखाली भोजन मंडप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार आषाढी यात्रा कालावधीमध्ये लाखो भाविकांना मोफत भोजन देण्यात येत आहे. मागील वर्षी भक्ती मार्गावर एकच भोजन मंडप उभारण्यात आला होता.

मात्र यंदा प्रथमच दोन ठिकाणी अन्नदान केंद्र उभारण्यात येत आहेत. त्यापैकी एक केंद्र चंद्रभागा बसस्थानका शेजारील पालखी मार्गांवर तर दुसरे गजानन महाराज पिछाडीला नवीन भक्त निवास समोर उभारण्यात येत आहे. वरील दोन्ही केंद्राची उभारणी महेश साठे यांच्या देखरेखीखाली सुरू असून भोजन मंडपाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. यात्रेदरम्यान तीन दिवस मोफत भोजन वाटप होणार आहे. यामध्ये पाणी बाटली, सरबत बाटली आणि पंचपक्वानाचे भोजन देण्यात येणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech