डेव्हलपमेंट विथ डॉक्टर…. खासदार डॉ.श्रीकांत शिंदेंशी थेट संवाद साधण्याची अंबरनाथ मध्ये संधी

0

अंबरनाथमध्ये रंगणार ‘डेव्हलपमेंट विथ डॉक्टर’

खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंशी संवाद साधण्याची संधी

अंबरनाथ : गेल्या दशकभरात ठाणेपल्याड आणि विशेषतः कल्याण लोकसभा मतदारसंघात पायाभूत सुविधांचे अनेक भव्य प्रकल्प पूर्णत्वास आले असून अनेक प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत. या दशकभराच्या विकासाचा आढावा घेणारा ‘टॉक ऑन डेव्हलपमेंट विथ डॉक्टर’ या विशेष कार्यक्रमाचे रविवारी सकाळी आयोजन करण्यात आले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी यावेळी जाहिर संवाद साधला जाईल. या माध्यमातून विकास प्रकल्प, त्यांची दिशा, त्यामागची संकल्पना अशा अनेक विषयांवर अंबरनाथ शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत संवाद रंगेल. अंबरनाथ पूर्वेतील नव्याने सुशोभीकरण झालेल्या पंडीत जवाहरलाल नेहरू उद्यानात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होईल.

ठाणे पल्याड विकासाच्या दृष्टीने गेल्या दहा वर्षांचा काळ महत्वाचा ठरला आहे. रेल्वेशिवाय अन्य वाहतुकीच्या पर्यायांचा विचारही न होण्याचा काळ ते रस्ते मार्गाने मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे गाठण्याला पसंती देण्याचा काळ असा पायाभूत सुविधांचा संक्रमणाचा मोठा काळ गेल्या दशकभरात पाहिला गेला आहे.

कल्याण ते तळोजा मेट्रो १२, काटई – कर्जत राज्यमार्गाचे रूंदीकरण, कल्याण शीळ रस्त्याचे सहापदरीकरण, शिळफाटा येथे उड्डाणपूल, मुंब्रा वाय जंक्शन येथे उड्डाणपूल, काटई ऐरोली उन्नत मार्ग, कल्याण रिंग रोड, अंतर्गत रस्ते अशा एकाहून एक महत्वाकांक्षी प्रकल्पांची पायाभरणी, सुरूवात या दशकभरात झाली.

त्यातील बहुतांश प्रकल्प पूर्णतः तर काही अंशतः मार्गी लागले. आरोग्य, क्रीडा, प्राचीन वास्तूंचे जतन, शिक्षण, पाणी अशा विविध विषयांवर दशकभरात मोठे काम झाले.

या सर्वांमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे योगदान मोठे आहे. याच विषयासह अंबरनाथ शहरात झालेल्या विविध प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी ‘टॉक ऑन डेव्हलपमेंट विथ डॉक्टर’ या विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, १० मार्च रोजी सकाळी दहा वाजता अंबरनाथ पूर्वेतील पंडीत जवाहरलाल नेहरू उद्यानात हा संवाद कार्यक्रम रंगेल. प्रसिद्ध निवेदिका पूर्वी भावे त्यांच्याशी संवाद साधतील.

यावेळी शहरातील मेडीकल असोसिएशन, डॉक्टर, सनदी लेखापाल, अभियंते, वास्तूविशारद, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, बँकर, रोटरी आणि संलग्न क्लब, समाजसेवक, ज्येष्ठ नागरिक, सांस्कृतिक संघटना, कलावंत, शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी, कामगार संघटनांचे सदस्य, पत्रकार, निवृत्त अधिकारी आणि इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech