ठाणे : अखिल भारतीय गुजराती समाज ठाणे, यांच्या वतीने नवनिर्वाचित आमदार संजयजी केळकर यांचा जाहीर सत्कार व दिवाळी स्नेहसंमेलन ठाणे येथे पार पडले. अखिल भारतीय गुजराती समाज विविध संघटना व श्री दिलीप शहा यांच्या पुढाकाराने कच्छ कडवा पाटीदार समाज सभागृह येथे, ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ह्यावेळी गुजराती समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मगन भाई ठक्कर, दिलीप भाई शहा, ठामपा परिवहन सदस्य विकास पाटील, गुजराती समाजाचे प्रतिष्ठित नागरिक व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.