अणुशास्त्रज्ञ चिदम्बरम यांचे वृद्धापकाळाने निधन

0

मुंबई – देशातील ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ राजगोपाल चिदम्बरम यांचे आज निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. पोखरण -१ (१९७५) आणि पोखरण-२ (१९९८) या दोन अणुचाचण्यांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आज पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास त्यांनी मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.आपल्या कारकिर्दीत चिदम्बरम यांनी भाभा अणू संशोधन केंद्राचे संचालक, अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव अशा उच्च पदांची जबाबदारी सांभाळली. १९९४-९५ या कालावधीत ते आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष होते.ते भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागारदेखील होते.देशाच्या अणुसंशोधनातील त्यांच्या बहुमुल्य योगदानासाठी त्यांना १९७५ साली पद्मश्री आणि १९९९ साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech