कुडाळमधून निलेश राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0

नारायण राणे, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकरांची उपस्थिती

सिंधुदुर्ग : कोणताही गाजावाजा न करता साध्या पद्धतीने महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्याजवळ दाखल केला यावेळी महायुतीचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप, शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई या महायुतीच्या वतीने निलेश राणे यांनी शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे काका कुडाळकर तसेच जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक संचालक बाबा परब, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, आर. के. सावंत, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये आदी उपस्थित होते.

अर्ज दाखल केल्यानंतर माहितीचे उमेदवार निलेश राणे यांनी सांगितले की या मातीने आम्हाला अनेक पदे दिले आहेत या मातीचे ऋण फेडण्यासाठी आम्ही सतत या मातीतील जनतेची सेवा करत राहणार आणि ही सेवा करता यावी म्हणूनच निवडणूक लढवत आहे ही निवडणूक आम्ही शांततेने घेणार आहोत आमची बांधिलकी ही जनतेशी आहे आमच्या सोबत जनता आहे त्यामुळे शक्ती प्रदर्शन करण्याची आम्हाला आवश्यकता नाही असे त्यांनी यावेळी सांगून जनता आम्हाला भरभरून आशीर्वाद देईल यात वाद नाही असे सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech