ठाणे : पंधराव्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे मतदान शपथ घेण्यात आली. त्याप्रसंगी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, विधी अधिकारी मकरंद काळे, महिला व बालविकास अधिकारी दयानंद गुंडप, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावला पाहिजे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. यावेळी, भारत निवडणूक आयोगाने ‘मतदानासारखे दुसरे काही नाही, मी मतदान करणारच’ अशी संकल्पना निश्चित केली आहे. त्याची माहिती अधिकारी आणि कर्मचारी यांना देण्यात आली. त्यानंतर, सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मतदान करण्याबाबतची शपथ घेतली.