छत्रपती संभाजीनगरचे उबाठा गटाचे माजी महापौर नंदकुमार घोडीले आणि त्यांच्या पत्नी अनिता घोडीले यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

0

*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भगवा हाती घेत शिवसेना पक्षप्रवेश संपन्न
* छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा उबाठा गटाला मोठा धक्का

मुंबई : छत्रपती संभाजीनगरचे उबाठा गटाचे माजी महापौर नंदकुमारजी घोडीले आणि त्यांच्या पत्नी माजी महापौर अनिता घोडीले यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील निवासस्थानी येऊन शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी त्यांचे आणि त्यांच्यासह आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून स्वागत केले.

राजकुमार घोडीले हे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेत सुरुवातीपासूनच कार्यरत होते. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत एकदा त्यांनी तर एकदा त्यांची पत्नी अनिता घोडीले यांनी महापौरपद भूषविले होते. विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या विरोधात निवडणुकीचे तिकीट मिळालेल्या माजी महापौर किशनचंद तनवाणी यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर उबाठा गटाने घोडीले यांना उमेदवारी देऊन निवडणूक लढवण्यास सांगितले होते. मात्र त्यावेळी त्यांनीही निवडणूक लढवायला नकार दिला होता, त्यानंतर आज त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. राज्याचे समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनीही या पक्षप्रवेशासाठी विशेष प्रयत्न केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली विकासकामे आणि त्यांची कार्यशैलीने प्रभावित होऊन आपण शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत असल्याचे नंदकुमार घोडीले यांनी यावेळी बोलताना सांगितले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदूत्वाचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवत अंगिकारून शिवसेनेची वाटचाल पुढे सुरू आहे. गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने केलेल्या विकासकामांनी प्रेरित होऊन अनेक शिवसैनिकांनी आम्हाला साथ देण्याचा निर्णय घेतला, आगामी काळात ही संख्या अजून वाढलेली आपल्याला दिसेल असे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच नंदकुमार घोडीले आणि अनिता घोडीले यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेची ताकद अधिक वाढणार असून त्याचा पक्षाला नक्की फायदा होईल असा विश्वास शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असल्याने त्यादृष्टीने तत्काळ कामाला लागण्याची सूचना त्यांनी घोडीले यांना दिल्या. पक्षवाढीचे काम करताना लागेल ती मदत सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाईल असेही शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. यावेळी शिवसेना सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ हे देखील उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech