नागपूर : मुंबई येथील गेट वे हून एलिफंटाकडे जाताना बोट उलटली. ही घटना अतिशय दुर्दैवी व दुःखद आहे. अंदाजे सात ते आठ जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बोटीतील लोकांना मदत वेळेवर पोहोचल्यामुळे त्यांना वाचवता आले. या घटनेची अधिकची सविस्तर माहिती घेतली जाईल. दुर्घटना ग्रस्तांना योग्य ती मदत दिली जाईल. असे, निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.