मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएस) पूर्व परीक्षा ६ जुलै रोजी होणार होती. मात्र ही पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. ही परिक्षा आता २१ जुलै रोजी होणार आहे. आर्थिक मागासवर्गीयांना ओबीसी वर्गातून अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी विनंती करण्यात आली होती. एमपीएससीने ही विनंती मान्य केली. त्यानंतर ही पूर्व परिक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली. याबाबतची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवरही प्रसिद्ध करण्यात आली.