अंगावर चार वेळा गाडी घालून मावसभावाची हत्या

0

छ. संभाजीनगर : चित्रपटातील दृश्याप्रमाणे आरोपीने मावसभावाचा खून केल्याने खळबळ उडाली आहे. पवन मोढे असे मृत तरुणाचे नाव आहे. हत्या करणारा आरोपी सचिन वाघचौरे हा मृताचा मावसभाऊ असल्याचे तपासात समोर आले आहे. ही घटना वाळूज भागातील शेंदूरवादा रस्त्यावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत पवन आणि आरोपी सचिन दोघे मावसभाऊ आहेत. पवनचे वडील शिवराम यांच्या भाच्याने आरोपी सचिन वाघचौरे यांच्या मुलीशी प्रेमविवाह केला. त्यावर अचानक चर्चा होत असताना शिवराम यांनी मावसभाऊ सचिन याला घडलेले विसरून जा, असे सांगून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यावर दोघांच्या प्रेमविवाहाला शिवराम यांनी मदत केल्याचा सचिनच्या मनात संशय आला. त्यानंतर त्याचा रागाचा पारा चढला.

शिवराम यांचा मुलगा पवन याचे लग्न चार एप्रिल रोजी होणार आहे. त्यासाठी पैसे आणण्यासाठी पिता-पुत्र दोघे दुचाकीने बँकेत गेले होते. प्रेमविवाह करण्यात मदत केल्याच्या राग मनात ठेरून असणारा आरोपी सचिन वाघचौरे आणि इतर पाच जणांना रस्त्याने जाणारे शिवराम आणि पवन दुचाकीवरुन जाताना त्यांना दिसले. त्यामुळे आरोपीचा राग अनावर झाला. बँकेतून परतत असताना आरोपी आणि त्याच्या पाच साथीदारांनी त्यांच्या दुचाकीला बोलेरो गाडीने धडक दिली. यात पवन आणि शिवराम दोघेही रस्त्यावर कोसळले.

आरोपीने भर रस्त्यात त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दोघेही रस्त्यावर कोसळले. यानंतर आरोपींनी गाडी वळवून आणत पुन्हा बोलेरो जीप त्यांच्या अंगावर घातली. गाडी पवनच्या डोक्यावरून गेली. रागात असलेल्या आरोपीने चार वेळा पवनच्या अंगावरून गाडी नेली. त्यात पवनचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech