‘मोदी ओरिजिनल ब्रँड’ भाजपाची पोस्टरबाजी

0

मुंबई – नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत असल्याचा आनंद साजरा करताना मुंबई भाजपाने शिवसेना भवन आणि शिवशेनेचे (उबाठा) मुखपत्र सामना कार्यालयाच्या परिसरात ‘मोदी ओरिजिनल ब्रँड’ असे पोस्टर लावून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला.

लोकसभा निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्रात मोठा फटका बसला. त्यावरून ठाकरे गटाकडून भाजपाला वारंवार लक्ष्य करण्यात आले. तर प्रत्युत्तरादाखल भाजपाकडून उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांचा अनुनय करून यश मिळविले, असा आरोप केला गेला.

पंतप्रधान मोदींनी लोकसभेच्या प्रचार सभांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख वारंवार नकली शिवसेना असा केला होता.तोच धागा पकडत भाजपाने ‘मोदीच ओरिजिनल ब्रँड’ अशी पोस्टरबाजी केली .पोस्टरवर मोदींचा कपाळावर भस्माचा पट्टा लावेला फोटो आणि खाली उजव्या कोपऱ्यात भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा फोटो आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech