दहीहंडी असोसिएशनचा मनसे उमेदवार अविनाश जाधव यांना जाहीर पाठींबा
ठाणे : विधानसभा निवडणुकीत अनेक प्रस्थापित राजकिय पक्ष रिंगणात असतानाही ठाण्यातील गोविंदा पथके मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहेत. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार अविनाश जाधव यांना दहीहंडी असोसिएशनतर्फे जाहिर पाठींबा दर्शविण्यात आला आहे. दहीहंडी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अविनाश जाधव यांनी या निवडणुकीत मनस्वी शुभेच्छा दिल्या असून यंदा ठाण्यात यंदा विजयाची हंडी मनसेच फोडणार असल्याचा विश्वास दहीहंडी पथकाने दिला.
महाराष्ट्राच्या संस्कृतीतील महत्वाचा सण असलेल्या दहीहंडी सणावर अनेक निर्बंध आले. सन २०१५ साली दहीहंडी सण कायद्याच्या कचाट्यात सापडलेला असताना आणि गोविंदा पथकासाठी कुणीही वाली राहिला नव्हता. अशा वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाठीशी होते. तसेच मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन तर केलेच, किंबहुना दहीहंडी उत्सवावर आलेल्या निर्बधांना जाहीरपणे विरोध दर्शविला होता. त्यामुळेच आज सर्वजण दहीहंडी उत्सव दणक्यामध्ये साजरा करत आहेत. कुठलाही पक्षपात न करता अविनाश जाधव गोविंदा पथकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहीले. त्यामुळे, एक सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा आपल्यातलाच एक आपल्या हक्काचा माणूस असलेल्या अविनाश दादाच्या पाठीशी सर्व गोविंदा पथके उभी राहिली आहेत. या अनुषंगाने दहीहंडी असोसिएशनच्या (महा) वतीने तसेच मुंबई ठाण्यातील सर्व गोविंदा पथकांच्या वतीने अविनाश जाधव यांना जाहीर पाठींबा दर्शवत असल्याचे दहीहंडी असोसिएशनने आपल्या पाठींबा पत्रात नमुद केले आहे.
ठाण्यातील गोविंदा पथके मनसेच्या पाठीशी
हिंदूचे सण उत्सव जल्लोषात होण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमीच पाठीशी असतात. दहीहंडीची पंढरी ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात पथकातील गोविंदांना मनसेच सर्वात जास्त धीर देते. पथकातील गोविंदांच्या मागे मनसेचे अविनाश जाधव भक्कम उभे असल्याने ठाण्यातील गोविंदा पथके मनसेच्या पाठीशी असल्याचा विश्र्वास दहीहंडी असोसिएशने जाधव यांना दिला.