राज्यात आगामी निवडणुकीत भाजपा महायुतीचेच सरकार येणार – आ.पंकजा मुंडे

0

अहमदनगर – राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारार्थ आ.पंकजा मुंडे यांनी शिराळ चिचोंडी येथे जाहीर सभा घेतली. या सभेत बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या राज्यात आगामी निवडणुकीत भाजप महायुतीचे सरकार येणार हे निश्चित आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजी कर्डिले हे आमच्यासाठी लकी आहेत.ते यंदा शंभर टक्के निवडून येणार आहेत आणि सरकारही आपलेच असणार आहे.विखे पाटील यांची मोठी ताकद पक्षासाठी सक्रिय आहे.लोकसभा निवडणुकीमध्ये माझा व माजी खासदार सुजय विखे पाटील यांचा पराभव फेक नरेटिव्हमुळे झाला आहे.आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक शौचालय,गॅस सिलेंडर,शेतकरी सन्मान योजना,आयुष्यमान भारत योजना यशस्वीपणे राबवलली आहे.

देशात नरेंद्र मोदीचे सरकार असून महाराष्ट्रात देखील महायुतीचे सरकार आणायचे आहे.लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहण्या साठी नगर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा. भाऊ एक वेळेस बहिणीला सोडत असतो मात्र बहीण कधीही भावाला सोडत नसते.विरोधकांना चांगले सरकार चालवता येत नाही.नगर जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी माझी आहे.म्हणून माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या सारख्या हुशार पैलवानला निवडून द्या.स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे आमदार,खासदार बनवणारी फॅक्टरी होती.विरोधक सविधान जातियवाद यावर अफवा पसरवतात या गोष्टीवर विश्वास न ठेवता विकासाच्या कामाला मतदान करावे,असे आवाहन भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी केले.

राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारार्थ आ.पंकजा मुंडे यांनी शिराळ चिचोंडी येथे जाहीर सभा घेतली.यावेळी माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील,आमदार मोनिका राजळे,श्रीगोंद्यातील भाजपचे उमेदवार विक्रम पाचपुते,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे व,भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग,नगराध्यक्ष सत्यजित कदम,माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे,युवा नेते अक्षय कर्डिले,राजू शेटे,ह सुरेश बानकर,अशोक सावंत,मृत्युंजय गर्जे,दिलीप जठार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech