लाडकी लेक वियानाला घेऊन आमदार नमिता मुंदडा शपथविधीला

0

मुंबई : बीडमधील केजच्या आमदार नमिता मुंदडा या लाडकी लेक वियानाला घेऊन अधिवेशनाला आल्या आहेत. यावेळी त्यांनी पाच वर्षांआधीची आठवण सांगितली. तसंच लेकीसोबतचे विधिमंडळातील फोटोही शेअर केलेत. याबद्दल त्यांनी फेसबुकवर एक भावूक पोस्ट शेअर केलीय. फडणवीस सरकारचं पहिलं विशेष अधिवेशन होत आहे. या विशेष अधिवेशन काळात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. या पहिल्या दिवशी नमिता लेक वियानाला घेऊन आल्या होत्या. बीडमधील केडच्या आमदार नमिता मुंदडा या लाडकी लेक वियानाला घेऊन अधिवेशनाला आल्या होत्या. लेक वियाना ही दोन महिन्यांची होती, तेव्हा नमिता मुंदडा तिला घेऊन विधिमंडळात आल्या होत्या. त्यावेळी दोन महिन्यांच्या लेकीला घेऊन विधिमंडळात आल्याने नमिता मुंदडा यांची प्रचंड चर्चा झाली होती.आता तिच त्यांची चिमुकली वियाना पाच वर्षांची झाली आहे. मागच्या वेळी ती गर्भात असताना शपथविधी घेतलेल्या मुंदडांनी यावेळी शपथविधीसाठी तीला सोबत विधीमंडळात आणले आणि सोशल मिडीयावर त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

माझ्या पोटात वाढत असलेल्या छोट्या जीवाने मला त्या क्षणाला आधार दिला, जणू तिच्या स्पंदनातून ती म्हणत होती,”आई, तू हे करू शकतेस !” आज पाच वर्षांनंतर तीच माझी चिमुकली कन्या वियाना आता पाच वर्षांची झाली आहे. तिच्या छोट्या हातात हात धरून पाच वर्षानंतर पुन्हा एकदा मी शपथविधिच्या निमित्ताने विधिमंडळाच्या दारात उभी आहे. हा क्षण माझ्यासाठी एक आमदार म्हणूनच नव्हे तर एक आई म्हणून खूप आनंददायी आहे. तिच्या डोळ्यांत माझ्याबद्दलचा अभिमान पाहून माझं हृदय भरून आलंय. तिच्या लहानशा हातांनी माझं बोट घट्ट धरलेलं पाहून वाटतंय – संघर्षाचा प्रत्येक क्षण, त्यागाचं प्रत्येक पाऊल सार्थ ठरलं. नमिता मुंदडा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे कि, पाच वर्षांपूर्वीची ती सकाळ अजूनही माझ्या मनात कोरलेली आहे. गर्भवती अवस्थेत, हृदयात असंख्य स्वप्नं, भीती आणि अनेक जबाबदाऱ्या घेऊन मी पहिल्यांदा विधिमंडळाच्या दाराशी उभी होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech