रत्नागिरी – महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जाहिरनाम्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून पक्षाने त्याचे स्वरुप परंपरागत जाहिरनाम्यापेक्षा वेगळे असणार आहे. आता ‘अंमलबजावणी आराखडा’ करण्याचे निश्चित केले आहे. या आराखड्यासाठी मतदारांनी विविध मुद्द्यांबाबत महाराष्ट्राच्या विकासाच्या आपल्या आकांक्षा सूचनांच्या स्वरूपात पक्षाकडे पाठवाव्यात, असे आवाहन आ. चित्रा वाघ यांनी आज रत्नागिरीमध्ये भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केले.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारांनी केंद्रात आणि राज्यात अंमलबजावणीच्या आघाडीवर उल्लेखनीय यश मिळविले आहे. परंपरागत जाहीरनाम्यात केवळ आश्वासने असतात. संकल्पपत्र ही पुढची पायरी होती. आता सत्तेवर पुन्हा येण्याच्या आत्मविश्वासातून आम्ही आमच्या संकल्पांतून कशा प्रकारे आराखडा अमलात आणायचा, याची तयार करीत आहोत’, असेही आ. वाघ यांनी सांगितले.