यावर्षीपासून मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन – अ‍ॅड.आशिष शेलार

0

मुंबई : शासनाचा अधिकृत असा महोत्सव नसल्याने यावर्षीपासून मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्याची संकल्पना या खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अ‍ॅड.आशिष शेलार यांनी मांडली, त्याला आता मुहूर्त स्वरूप आले आहे. यावर्षीचा हा पहिला चित्रपट महोत्सव मुंबईत होणार असून तीन दिवसांचा हा महोत्सव असेल. जे मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाहीत असे चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येतील. प्रत्येक चित्रपटा सोबत त्या चित्रपटाची टीम उपस्थित असेल जी थेट दर्शकांशी संवाद साधेल, या निमित्त काही विशेष परिसंवाद व या विषयातील अभ्यासकांच्या मुलाखती अशा आंतरराष्ट्रीय मानकांच्या स्वरूपात राज्याचा मराठी चित्रपट महोत्सव केला जाणार आहे. याबाबतच्या तारखा व नियमनियमावली लवकरच जाहीर करण्यात येतील. या महोत्सवात दर्जेदार मराठी चित्रपटांचा आस्वाद चित्रपट रसिकांना मिळणार आहे. याबाबतची अमलबजावणी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे.

मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले. गेल्या ६० वर्षापासून राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. मात्र शासनाचा अधिकृत असा चित्रपट महोत्सव आयोजित केला जात नाही. राज्यात विविध ठिकाणी विविध संस्थांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे आयोजन केले जाते. अशा संस्थांना १० लाखापासून ४ कोटीपर्यंत शासन अर्थसहाय्य करते. मात्र शासनाचा अधिकृत असा महोत्सव नसल्याने यावर्षीपासून मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्याची संकल्पना या खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अ‍ॅड.आशिष शेलार यांनी मांडली, त्याला आता मुहूर्त स्वरूप आले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech