मुंबई : राज्याच्या मंत्रिमडळातून वगळल्यानतर सुरुवातीला नाराज नसल्याचं सांगणारे दीपक केसरकर यांनी आता मात्र त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे. अनेक लोकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केला, त्यांची मला कीव वाटते असं दीपक केसरकर म्हणाले. मला जी संधी द्यायची ती साईबाबा देतील. कदाचित मंत्रिदापेक्षाही वरच्या पदावर मी जाईन असा विश्वास दीपक केसरकरांनी व्यक्त केला.
सिंधुदर्गात माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. दीपक केसरकर म्हणाले की, “अनेक लोकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले, त्यांची मला कीव वाटते. माझं मंत्रिपद देव ठरवत असतो. मी कदाचित मंत्र्यापेक्षांही वरच्या पदावर जाईन. मी साईबाबांचा भक्त आहे. मला पद द्यायला साईबाबा समर्थ आहेत. मंत्रिपद नसल्यामुळे आता मला मोकळा श्वास घेण्याची संथी मिळाली. त्यामुळे मी आनंदात आहे”