गुंतवणूक घेऊन येऊ, असे सांगणारे अनेक उद्योजक – आदित्य ठाकरे

0

रत्नागिरी : या राज्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व असेल तर राज्यात आम्ही गुंतवणूक घेऊन येऊ, असे सांगणारे अनेक उद्योजक आहेत, असे सांगून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावरही जोरदार टीका केली. आम्ही दिल्लीश्वरांच्या विरोधात लढत आहोत. गुजरातमधून जे आक्रमण होत आहे, त्याच्याविरोधात आम्ही लढत आहोत. दापोली विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार भास्कर जाधव, युवा सेनेचे नेते अमोल कीर्तीकर, तालुकाप्रमुख ऋषी गुजर आदी पदाधिकारी होते.

वेदांत फॉक्सकॉन, बल्क पार्कसारखे मोठे प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले तेव्हा आम्हाला वाईट वाटले आणि आता हे गद्दार, खोकेबाज, घोटाळेबाज सरकार धोके देत आहे. असे आपल्या सरकारमध्ये नव्हते, अशा शब्दांत ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली. ठाकरे म्हणाले, तुम्हाला परत गुंडाफुंडांचे सरकार आणायचा आहे का? यांची गुंडगिरी एकाधिकारशाही संपवा, असे सांगत त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेना नेते रामदास कदम, नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, कोविड काळात आम्ही कधी कोणत्याही कामगारांना वाऱ्यावर सोडले नव्हते. आमच्या काळात उद्योग मंत्री फक्त जनतेचा विचार करत होते. आताचे उद्योगमंत्री फक्त डांबरात बुडालेले आहेत. ते फक्त स्वतःचा विचार करतात.
ते पुन्हा आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. गद्दारीला हद्दपार करण्यासाठी तुम्ही तयार आहात का, असा सवाल करून परिवर्तन आणायचे असेल तर २० तारखेला तुम्हाला मतदान करावे लागेल आणि त्या मतदानाची निशाणी मशाल असेल, असे त्यांनी सांगितले. राज्यात या गद्दारीविरुद्ध परिवर्तन घडवायचे असेल तर तुम्हाला एकत्र यावच लागेल आणि लढायला लागेल, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. जे मागच्या दोन वर्षांत आपल्या राज्यातून पाच लाख रोजगार गुजरातला नेले. अशा शब्दांत ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech