पाटणा- बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे संस्थापक जीतन राम मांझी हे गया मतदारसंघातून एनडीएचे उमेदवार आहेत. त्यांच्याकडे ११.३२ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे आणि त्यांच्याकडे ४९,००० रुपये रोख रक्कम आहेत, अशी माहिती त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे.
मांझी यांनी गुरुवारी गया मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गया, नवाडा, जमुई आणि औरंगाबादमध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी १९ एप्रिलला मतदान होणार आहे. मांझी यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे १३.५० लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, तर त्यांची पत्नी शांती देवी यांच्याकडे ५.३८ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.२०१९ च्या निवडणुकीत त्यांनी १०.२ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आणि ४०,००० रुपये रोख असल्याचे जाहीर केले होते.पण यावेळी त्यांच्याकडे स्वत: ची कोणतीही स्थावर मालमत्ता नाही आणि त्याच्याकडे १३.५० लाख रुपयांचे वडिलोपार्जित घर आहे.